ऍक्सिस बँकेतर्फे मुंबई पोलिसांना ५ हजार रेनकोट भेट; आयुक्त परम बीर सिंहांनी मानले आभार
मुंबई: ऍक्सिस बँकेतर्फे मुंबई पोलिसांना ५ हजार रेनकोट काल देण्यात आले. मुसळधार पावसातही मुंबई पोलीस आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत असतात.
मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. आपल्या ट्विट मध्ये ते म्हणाले की, “”भरभरून बरसणाऱ्या मेघराजाची तमा नसे….
मुंबापुरीची सेवा हेच ब्रीद हृदयात बसे ….
धो धो कोसळणाऱ्या पावसात सुरळीत वाहतूक आणि सुरक्षित मुंबईसाठी झटणाऱ्या मुंबई पोलीसांसाठी ॲक्सिस बँकेने ५००० रेनकोट दिले….. चांगल्या कामासाठी आम्हाला मिळणारी हीच प्रेरणा आहे.”
"भरभरून बरसणाऱ्या मेघराजाची तमा नसे….
मुंबापुरीची सेवा हेच ब्रीद हृदयात बसे ….धो धो कोसळणाऱ्या पावसात सुरळीत वाहतूक आणि सुरक्षित मुंबईसाठी झटणाऱ्या मुंबई पोलीसांसाठी ॲक्सिस बँकेने ५००० रेनकोट दिले….. चांगल्या कामासाठी आम्हाला मिळणारी हीच प्रेरणा आहे.
— Commissioner of Police, Greater Mumbai (@CPMumbaiPolice) July 21, 2020
