Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

राज्यातल्या ५१ पोलिस आणि अग्निशमन विभागातल्या ७ जणांना विविध राष्ट्रीय पदकं जाहीर

राज्यातल्या ५१ पोलिस आणि अग्निशमन विभागातल्या ७ जणांना विविध राष्ट्रीय पदकं जाहीर

मुंबई: यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरातल्या ९३९ पोलिसांना विविध पदकं जाहीर झाली आहेत. त्यातल्या १८९ जणांना शौर्य पदक जाहीर करण्यात आले आहे. १८९ पैकी सर्वाधिक १३४ जम्मू काश्मिर मधले आहेत.

महाराष्ट्रातल्या ७ जणांना हे पदक मिळालं आहे. राज्यातल्या गोपाल उसेंडी, महेंद्र कुलेटी, संजय बकमवार, भरत नागरे, दिवाकर नरोटे, निलेश्वर पाडा, संतोष पोटावी यांना शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे.

देशातल्या ८८ जणांना उत्कृष्ट सेवेकरता राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर करण्यात आलं आहेत. यात राज्यातल्या चौघांचा समावेश आहे. अतिरीक्त पोलिस महासंचालक विनय करगांवकर, धुळ्याचे राज्य राखीव पोलिस दलाचे समादेशक प्रल्हाद खाडे, पुण्यातले पोलिस निरीक्षक चंद्रकांत गुंडागे आणि नांदेडचे पोलिस उपनिरीक्षक अनवर बेग इब्राहिम बेग मिर्झा यांना हे पदक जाहीर करण्यात आलं आहे. गुणवत्तापूर्ण सेवेसाठी देशातल्या ६६२ जणांना पदक जाहीर करण्यात आले आहेत.

राज्यातल्या ४० जणांचा यात समावेश आहे. 
गोपाल उसेंडी
महेंद्र कुलेटी
संजय बकमवार
भारत नागरे
दिवाकर नरोटे
निलेश्वर पाडा
संतोष पोटावी
President’s Fire Service Medal for Distinguished Service
विनय कारगांवकर
प्रल्हाद खाडे
चंद्रकांत गुंडगे
अनवर बैग इब्राहिम बैग मिर्झा
For Meritorious Service
राजेश प्रधान
चंद्रकांत जाधव
सीताराम जाधव
भरत हुंबे
गजानन भातलावंडे
अजयकुमार लांडगे
जितेंद्र मिसाळ
विद्याशंकर मिश्रा
जगदीश कुलकर्णी
सुरेंद्र मलाले
प्रमोद लोखंडे
मिलिंद नगावकर
शशिकांत जगदाळे
रघुनाथ निंबाळकर
संजय कुलकर्णी
राष्ट्रपाल सवाईतुल
प्रकाश चौधरी
नंदकिशोर सरफरे
राजेश जाधव
शिवाजी देसाई
राजाराम भोई
देवेंद्र बागी
संभाजी बनसोडे
बबन शिंदे
पांडुरंग वांजळे
विजय भोंग
पांडुरंग निघोट
राजेंद्र चव्हाण
अनिल भुरे
संजय तिजोरे
रविकांत बडकी
अल्ताफ मोहियोद्दिन शेख
सत्यनारायण नाईक
बस्तार मडावी
काशिनाथ उभे
अमरसिंह भोसले
आनंदराव कुंभार
मधुकर पवार
सुरेश वानखेडे
लहु राऊत

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सेवेतल्या मुंबईत सहायक संचालक असलेल्या श्रीमती बिंदू शर्मा, नागपुरातले अतुल कानेटकर यांनाही हे पदक जाहीर झालं आहेत.

सीबीआयचे मुंबईतले पोलिस निरीक्षक महेश पारकर, हेड कॉन्स्टेबल महेश गजरलवार, NIA अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेत मुंबईत कार्यरत कॉन्स्टेबल नवनाथ शिंदे यांनाही गुणवत्ता पूर्ण सेवेसाठी पदक जाहीर करण्यात आलं आहे.

अग्निशमन विभागातले अधिकारी आणि जवानांसाठीही राष्ट्रपती शौर्य पद आणि उत्कृष्ट सेवा पदक आज जाहीर झालं. अग्निशमन दलातले फायरमन बाळू देशमुख यांना मरणोत्तर राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झालं आहे.

२ वर्षापूर्वी तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये लागलेल्या आगीत त्यांचा मृत्यू झाला होता. पुणे महापालिकेतले मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झालं आहे. तर गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे यांना जाहीर झालं आहे.
उपमुख्य अग्निशमन अधिकारी संजय मांजरेकर, फायरमन सुरेश पाटील, संजय महामुनकर, चंद्रकात अननदास यांनाही हे पदक जाहीर झालं आहे.

Source-AIR

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *