अमेरिकेतील न्यूयॉर्क टाईम्स चा दावा
मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरात काही महिन्यांपूर्वी विद्युत पुरवठा विस्कळीत झाल्याची घटना घडली होती. चीनच्या सायबर हल्ल्यामुळे ही घटना घडल्याचा दावा न्यूयार्क टाइम्स या वृत्तपत्राने केला होता. या पार्श्वभूमीवर चौकशीचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.
शासन या दाव्यानुसारही या घटनेची चौकशी करणार असून आज याबाबतची माहिती सायबर विभागाला देणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
