Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मुंबई-ठाणे सह राज्यात दहीहंडीचा उत्साह शिगेला

मुंबई-ठाणे सह राज्यात दहीहंडीचा उत्साह शिगेला

मुंबई/ठाणे, दि. १९ : महाराष्ट्रात सर्वत्र काल रात्री कृष्ण जन्म साजरा झाल्यानंतर आज दहिहंडीचा थरार रंगत आहे. गेली दोन वर्ष कोरोनाच्या साथीमुळं हा उत्सव साजरा करण्यावर बंधनं आली होती, यंदा मात्र दहिहंडी उत्सवावर कोणतीही बंधनं नसल्यानं यावेळी नागरिकांमध्ये विशेष उत्साह आहे. मुंबई, ठाणे येथील मोठ्या आयोजकांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाला लोकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. दरम्यान राज्याची सांस्कृतिक ओळख आणि परंपरा असलेल्या दहिहंडीच्या प्रो गोविंदा स्पर्धा घेण्यात येतील अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधानसभेत केली. स्पर्धेसाठी बक्षीसाची रक्कम शासनातर्फे देण्यात येईल. त्याचबरोबर गोविंदांना खेळाडू संवर्गातून शासकीय नोकरी देण्यात येईल; असंही ते म्हणाले.

स्पेन आणि चीन या देशांमध्ये मानवी मनोरे म्हणून या खेळाचा क्रीडा प्रकारात समावेश असून आपल्याकडे असलेल्या कबड्डी, खो-खो, मल्लखांब सारख्या खेळांप्रमाणे दहीहंडीचाही समावेश होईल, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मानवी मनोरे तयार करताना आवश्यक त्या स्थानिक अधिकृत परवानगी घेतलेल्या तसंच प्रशिक्षित पथकातील गोविंदांना मनोऱ्याच्या थरावरुन पडून मृत्यू झाल्यास त्यांच्या कायदेशीर वारसांना १० लाख रुपयाचं आर्थिक सहाय्य करण्यात येईल. तसंच गंभीर जखमींना साडे सात लाख रुपये किंवा ५ लाख रुपये आर्थिक सहाय्य दिलं जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

हा आदेश केवळ या वर्षीसाठी लागू राहील. दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांचा विमा उतरवण्याबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात येईल. दहीहंडी उत्सव आजच असल्यानं विमा योजनेच्या बाबतीत कार्यवाही करण्यासाठी कमी कालावधी असल्याने आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

आज दहीहंडी असून कार्यक्रमा दरम्यान कोणत्याही गोविंदास दुखापत झाल्यास शासकीय रुग्णालयांमध्ये त्यांना मोफत उपचार देण्यात यावेत अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधानसभेत केली होती.

त्यानुसार राज्यातील सर्व शासकीय दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये,  महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हापरिषदेचे दवाखाने यांना नि:शुल्क वैद्यकिय उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात काढण्यात आलेला शासन निर्णय हा स्थायी असून यावर्षी पासून दर वर्षासाठी लागू राहील.

Source – AIR

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *