Monsoon
यंदा राज्यात मान्सून समाधानकारक; ९६ टक्के पावसाची शक्यता
राज्यात उन्हाचे चटके मोठ्या प्रमाणावर बसत असताना यंदाचा मान्सून समाधानकारक असेल, अशी खूशखबर हवामान शास्त्र विभागाने सोमवारी दिली. पावसाचे सरासरी प्रमाण ९६ टक्के असेल, असा शेतकऱ्यांना दिलासा देणारा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
केंद्रीय भूगर्भ विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. राजीवन नायर यांनी पत्रकार परिषदेत मान्सूनचा पहिला अंदाज वर्तविला. जूनच्या पहिल्या आठवडय़ात दुसरा आणि अंतिम अंदाज वर्तविला जाईल.
हवामान विभागाने सोमवारी आपला पहिला अंदाज वर्तविला. या अंदाजानुसार जून ते सप्टेंबर या चार महिन्यात सरासरी पावसाची शक्यता ६० टक्के एवढी आहे. गेल्या वर्षी सरासरीच्या ९७ टक्के मान्सूनचा पाऊस बरसेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. प्रत्यक्षात ९१ टक्केच बरसला आणि मराठवाडा, विदर्भासह देशाचा बराच भाग दुष्काळाने होरपळला.
दरम्यान, सलग दोन वर्षे चुकलेला हवामान खात्याचा अंदाज पाहता हाहि अहवाल खरंच खरा ठरणार आहे का? हेच मोठं कोडं आहे.
दक्षिण पश्चिूमी मॉनसून वर्षा 2019 का दीर्घावधि पूर्वानुमान pic.twitter.com/r27DV5Tdnw
— India Meteorological Department (@Indiametdept) April 15, 2019
