Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

‘टिकटॉक’ ऍप प्ले स्टोअर वरून हटवण्याचे निर्देश, ‘पबजी’ वालेही चिंतेत

Tiktok

‘टिकटॉक’ ऍप प्ले स्टोअर वरून हटवण्याचे आदेश, ‘पबजी’ वालेही चिंतेत

मोबाईल ऍप विश्वात धुमाकूळ घालणारे आणि समस्त तरुणाईचा हक्काचा टाईम पास असलेले ‘टीक टॉक’ ऍपवर संक्रांत अली आहे. या ऍप प्रेमींसाठी एक दुःखद बातमी आहे. केंद्र सरकारने हे ऍप गूगल प्ले स्टोअर व ऍप्पल स्टोअर वरून हटविण्याचे निर्देश दिले आहेत.
हे ऍप हटवण्यासंदर्भात एक याचिका मद्रास उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने या ऍप वर बंदी घातली. मात्र कंपनीने या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. पण आता सर्वोच्च न्यायालयानेही मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत पुढील सुनावणी २२ एप्रिल पर्यंत पुढे ढकलली आहे.
तूर्तास ‘टिक टॉक’ ज्यांच्या मोबाईल मध्ये इंस्टॉल आहे ते त्याचा वापर करू शकतात हाच काय तो ‘टिक टॉक’ प्रेमींसाठी दिलासा आहे. पण भविष्यात ऍप पूर्णपणे बंदही होऊ शकतं हे आजच्या निकालामुळे स्पष्ट झालं आहे. या निकालामुळे आता ‘पबजी’ प्रेमी थोडे चिंतेत आले आहेत.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *