१० जून पर्यंत मॉन्सून तळकोकणात होणार दाखल; हवामान विभागाचा अंदाज
अंदमान निकोबार द्विपसमूहात दाखल झालेला मान्सून बंगालच्या खाडीत वायव्य दिशेने पुढे सरकला आहे. केरळमध्ये पूर्वमोसमी पाऊस सुरु आहे. मान्सून दाखल होईपर्यंत तो सुरु राहील, असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.
मान्सून तळकोकणात १० जून पर्यंत पोहोचेल, त्यानंतर तो संपूर्ण राज्यात सक्रीय होईल, असं हवामान विभागानं सांगितलं आहे.
दरम्यान, बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिशा राज्यांना ‘यास’चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. यापार्श्वभूमीवर दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेड- संत्रागाछी – नांदेड एक्स्प्रेसची उद्या २४ मे आणि परतीची २६ मे रोजीची फेरी रद्द केली आहे.
