Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मार्केट यार्डातील पार्किंग माफियांना दणका; पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनानं काढली पार्किंग निविदा

मार्केट यार्डातील पार्किंग माफियांना दणका; पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनानं काढली पार्किंग निविदा

पुणे, दि.२४: काही घटकांची दादागिरी मोडीत काढून वाहनांना शिस्त लावण्यासाठी आणि बाजार समितीचं उत्पन्न सुरु करण्याच्या उद्देशानं पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने गेल्या ४० वर्षात प्रथमच पार्किंग निविदा काढली आहे.

गेल्या १५ वर्षांपासून फळं आणि भाजीपाला विभागातले काही कामगार, खरेदीदार टेम्पोधारकाकडून पार्किंगसाठी १०० ते २०० रुपये आकारत आहेत. याला चाप बसावा यासाठी राज्य शासनाच्या महा ऑनलाईनद्वारे ही प्रक्रिया राबवण्यात आली.

बाजार समितीला पहिल्यांदाच पार्किंगच्या माध्यमातून वार्षिक सुमारे १ कोटी ३३ लाखाचे उत्पन्न मिळणार आहे. येत्या मंगळवारपासून शुल्क आकारले जाणार असून या मध्ये कोकणातील मुक्कामी असणाऱ्या गाड्यांना काही प्रमाणात सवलत दिलेली आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *