चिंतेचा विषय ! या वर्षी मान्सून थोडा उशिरानेच भेटीला येईल ! : भारतीय हवामान विभाग
नवी दिल्ली: या वर्षी मान्सून आपल्या ठरलेल्या दिवसापेक्षा ५ दिवस उशिराने म्हणजेच ६ जून पर्यंत केरळ च्या किनाऱ्याला पोहोचेल. भारतीय हवामान खात्याने(आयएमडी) आज (दि.15) बुधवारी याची माहिती दिली.
आयएमडी ने सांगितलंय कि या वर्षी, सांख्यिकीय मॉडेल पूर्वानुमानाने असं समजलं आहे की केरळ मध्ये मान्सून ची सुरुवात थोड्या उशिराने होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाचं म्हणणं आहे की पावसाचं आगमन या तारखेच्या चार दिवस मागे – पुढेही होऊ शकतं. १८-१९ मे च्या दरम्यान अंदमानचा समुद्र, निकोबार बेटांचा समूह आणि दक्षिण-पूर्व बंगाल खाडीच्या दक्षिणी भागात, दक्षिण-पश्चिम मान्सून च्या पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे. तसं पाहायला गेलं तर केरळ मध्ये साधारण १ जून पर्यंत मान्सून चे आगमन होते.
या वर्षी भारतीय हवामान विभाग आणि खाजगी हवामान संस्था स्कायमेट या दोघांनी आधीच मॉन्सून उशिराने दाखल होण्याची भविष्यवाणी केली आहे. स्कायमेट ने मंगळवारी सांगितलं होतं की मॉन्सून ४ जून पर्यंत केरळ च्या किनाऱ्याला धडकेल. यात दोन दिवस मागे पुढे होऊ शकतात.
९३ टक्के पावसाचा अंदाज
देशात या वर्षी मान्सून चा पाऊस गतवर्षीपेक्षा २ टक्के कमी पडण्याची शंका आहे. गतवर्षी ९५ टक्के पाऊस झाला होता, या वर्षी ९३ टक्के पावसाचा अंदाज आहे. ही माहिती स्कायमेट वेदर ने दिलेली आहे.