मोहिते विरुद्ध मोहिते संघर्षाला सुरुवात
पंढरपूर: राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मोहिते विरुद्ध मोहिते या संघर्षाला सुरुवात झाली आहे.
आजपर्यंत ज्यांनी अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सत्ता भोगली, त्यांना जातीयवादी वाटणारा भाजप एका रात्रीत कसा चांगला वाटू लागला, असा प्रश्न विचारात डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी रणजितसिंह मोहिते पाटलांवर जोरदार टीका केली आहे.
धवलसिंह मोहिते पाटील यांनी काल अकलूजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. लवकरच डॉ. धवलसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
