महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणूक लढवणार नाही…वाचा प्रसिद्धीपत्रक
मनसे लोकसभा निवडणूक लढणार की नाही ह्या बराच काळापासून गुलदस्त्यात राहिलेल्या आणि चर्चिल्या गेलेल्या प्रश्नाचं उत्तर आज साऱ्यांना मिळालं. येती लोकसभा निवडणूक न लढवण्याचे मनसेने ठरवले आहे त्या संदर्भातील प्रसिद्धीपत्रक पक्षाने जाहीर केलं आहे. त्यात कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण पक्षातर्फे देण्यात आलेले नाही. फक्त शेवटची ओळ “बाकी १९ मार्च २०१९ ला बोलूच” ही लक्ष वेधून घेतेय. मनसे नेते शिरीष सावंत यांच्या सहीने हे प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना यंदाची "लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९" लढविणार नाही, बाकी १९ मार्च २०१९ ला बोलूच… जय महाराष्ट्र!#LokSabhaElections2019 pic.twitter.com/tq8La2y4qt
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) March 17, 2019
