Nitin Nandgaonkar Tw
विडिओ पहा : मनसे वाहतूक सेनेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर यांना तडीपारची नोटीस
बेशिस्त रिक्षा आणि टॅक्सीचालक तसेच गर्दुल्ले यांना मनसे स्टाइलने समाजावत स्वतःचा हिसका दाखवणारे मनसे वाहतूक सेनेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर यांना मुंबई पोलिसांनी दोन वर्षे तडीपारची नोटीस बजावली आहे.
मुंबईतील पासपोर्ट घोटाळा, ड्रग्स विकणारी टोळी, रिक्षा चालकांची दादागिरी नांदगावकर यांनी उघड केली होती. त्यासाठी कायदा हातात घेतल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. नांदगावकरांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचा ठपका ठेवत त्यांना तडीपार करण्यात आले आहे. ऐन निवडणुकीच्या काळात नांदगावकर यांना तडीपार करण्याच्या हालचालींना वेग आल्याने मनसेने या कारवाईला विरोध सुरू केला आहे.
मनसे नेते नितीन नांदगावकर यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ करत ही माहिती दिली आहे. मुंबई पोलिसांच्या या नोटिसीला उत्तर देताना संघर्ष अटळ असल्याची प्रतिक्रिया नांदगावकर यांनी फेसबुकवर दिली आहे. सर्वसामान्य नागरिकांना माझी भीती वाटते असा आरोप ठेऊन मला तडीपार करण्यासाठी मुबंई पोलीस कामाला लागले आहेत. महाराष्ट्र माझा आहे. कुठे कुठे मला तडीपार करणार? जनतेने सांगावे मी कुठे चुकतोय? माझी भीती नेमकी कोणाला वाटतेय? मी अन्यायाच्या विरोधात लढत राहणार, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला आहे.
दरम्यान, नांदगावकर यांच्या समर्थनार्थ फेसबुक, ट्विटरवर #isupportnitinnandgaonkar या नावाने मोहिम सुरू केली आहे. सोशल मीडियावर नेटीझन्सकडून नांदगावकर यांना जोरदार पाठिंबा मिळत आहे.
सर्वसामान्यांच्या समस्येला प्रसंगी धावून जाणाऱ्या, मुजोर व्यवस्थेला #मनसेदणका देणाऱ्या नितीन नांदगावकरांवरच खंडणीचे खोटे आरोप लावत सरकार २ वर्ष तडीपार करण्यासाठी तत्पर पण अन्यायाला 'वाचा' फोडणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांच्या पाठीशी सामान्य माणूस ठाम उभा आहे. #IsupportNitinNandgaonkar pic.twitter.com/Isg8M2ARqI
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) February 20, 2019
