Fighter Jet
पाकिस्तानने भारतचे मिग विमान पाडले, एक पायलट बेपत्ता – परराष्ट्र मंत्रालय
नवी दिल्ली – भारतीय हद्दीत पाकिस्तानने हवाई हल्ला केल्यानंतर त्यास भारताने चोख प्रत्युत्तर दिले. भारताने पाकिस्तानचे एक लढाऊ विमान जमिनीवर पाडले आहे. दरम्यान, या कारवाईत भारताचेही एक मिग 21 विमान गमावल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच भारताचा एक वैमानिक बेपत्ता असल्याचंही ते म्हणाले आहेत.
पाकिस्ताननं हा वैमानिक आपल्या ताब्यात असल्याचं म्हटलं असून या संदर्भात चौकशी करण्यात येत असल्याचंही रवीश कुमार यांनी सांगितलं. दरम्यान, प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार या वैमानिकाचं नाव अभिनंदन वर्थमान असून पाकिस्तानी सुरक्षा दलांनी विंग कमांडर अभिनंदन यांचा व्हिडिओ देखील जारी केला आहे. आपण तथ्यांची पडताळणी करत आहोत असेही विकास स्वरुप यांनी सांगितले.
