Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

Video : मते दिली नाहीत, तर कामे करणार नाही, मनेका गांधींचा मुस्लिम मतदारांना इशारा

Featured Video Play Icon

Video : मते दिली नाहीत, तर कामे करणार नाही, मनेका गांधींचा मुस्लिम मतदारांना इशारा

उत्तरप्रदेश : “२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत माझा विजय निश्चित आहे, पण मुस्लीम मतदारांनी मला मते दिली नाहीत तर खासदार झाल्यावर मी त्यांची कोणतीच कामे करणार नाही, त्यामुळे मला निवडणुकीत साथ द्या”, अशी उघड उघड धमकी सुल्तानपूर येथील भाजप उमेदवार आणि केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी गुरुवारी दिली.

सुल्तानपूर जिल्ह्यातील मुस्लिम बहूल गाव तुराबखानी परिसरात मनेका गांधी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. मुस्लिम मतदारांना धमकी दिल्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तुम्ही माझ्यासोबत या, नाहीतर तुमचे काम मी करणार नाही, अशी धमकी दिली. मनेका गांधी इतक्यावरच थांबल्या नाही तर त्या पुढे म्हणाल्या, माझ्या फाउंडेशनने तुमच्यासाठी १ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. परंतु, निवडणूक आल्यावर तुम्ही भाजपला मतदान करणार नाही, अशी भूमिका घेता. मी तर निवडणूक जिंकणार आहे. तुमच्या मतांशिवाय मी ही निवडणूक जिंकणार आहे. असेही त्या पुढे म्हणाल्या.

पुढे त्या म्हणाल्या की, मी जिंकणार आहेच. पण माझ्या या विजयात जर मुस्लीम मतदारांचा वाटा नसेल, तर तर मला बरं वाटणार नाही. मी स्पष्ट सांगते, माझे मन दुखावू नका. मग कोणी मुसलमान नोकरी मागण्यासाठी माझ्याकडे आला तर मी म्हणेन जाऊ दे. नाहीतरी याचे काम करून मला काय फायदा आहे? कारण नोकरी हीसुद्धा शेवटी सौदेबाजीच असते की नाही?

मी जर तुमच्याकडे मैत्रीचा हात पुढे करीत आहे, तर तुम्ही तो स्वीकारत का नाही? तुमच्या मतदानकेंद्राचा निकाल आला की मग मला पडलेली मते मी पाहीन, ती जर ५० किंवा १०० असतील तर मग तुम्ही माझ्याकडे कामाला याल तेव्हा मीसुद्धा विचार करीन’’, असा इशाराही यावेळी मेनका गांधीनी दिला.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *