मेगाब्लॉक वार्ता : रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज जम्बो मेगाब्लॉक
मुंबई : रविवारी मध्य रेल्वे मार्गावर दिवा ते दादर दरम्यान धिम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावर वडाळा रोड ते मानखुर्द दोन्ही दिशेकडील मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेेच पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरीवली ते अंधेरी स्टेशनदरम्यान जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे मार्गावर रविवारी सकाळी १०.३७ पासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत कल्याणहून सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या जलद मार्गावरील सर्व लोकल दिवा ते दादर स्टेशनदरम्यान धिम्या मार्गावरून धावतील.
रेल्वे ट्रॅक, सिग्नल यंत्रणेतील सुधारणेसाठी रविवारी सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५पर्यंत बोरीवली ते अंधेरी स्थानकादरम्यान दोन्ही मार्गांवर पाच तास जम्बो ब्लॉक घेण्यात येईल. यादरम्यान दोन्ही दिशेकडील धिम्या मार्गावरील सर्व लोकल सांताक्रुझ ते बोरीवली स्थानकादरम्यान दोन्ही मार्गावरील लोकल जलद मार्गावरून धावतील.
हार्बर मार्गावरील वडाळा रोड ते मानखुर्ददरम्यान दोन्ही दिशेकडील मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत तसेच सकाळी १०.३४ ते दुपारी ३.४४ वाजेपर्यंत सीएसएमटीहून वाशी, बेलापूर, पनवेलसाठी एकही लोकल धावणार नाही. याचप्रमाणे सकाळी १०.२१ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत पनवेल, बेलापूर, वाशीहून सीएसएमटीसाठी एकही लोकल धावणार नाही. ब्लॉक दरम्यान पनवेल-मानखुर्द-पनवेल विशेष लोकल चालविण्यात येतील.
