Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापटचा राजकारणात प्रवेश पण …..

priya bapat

मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापटचा राजकारणात प्रवेश पण ….. 

टीम मनोरंजन : अभिनेत्री प्रिया बापट हिने नाटकाच्या माध्यमातून निर्माती क्ष्रेत्रात पदार्पण केल्यानंतर ती एका नव्या भूमिकेसाठी तयार होत आहे. मराठी मालिका, नाटक, चित्रपट यात दमदार अभिनय केल्यानंतर तिने आपला मोर्चा हिंदी मालिकेकडे वळवला आहे. एका हिंदी वेबसिरीजमधून ती हिंदी मालिकांमध्ये पदार्पण करत असून त्यात एका राजकीय नेत्याची भूमिका साकारताना दिसणार आहे.

नागेश कुकुनूर यांच्या ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या हिंदी वेबसिरीजमधून प्रिया लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून यात तिची भूमिका पूर्णपणे वेगळी आहे. पौर्णिमा गायकवाड नावाच्या कणखर आणि महत्वकांक्षी मुलीची व्यक्तिरेखा ती साकारत आहे.

‘सिटी ऑफ ड्रीम्स’ वेबसिरीजची राजकारणाभोवती फिरणारी ही कथा आहे. वडिलांचे राजकीय अस्तित्व जपण्यासाठी पौर्णिमा राजकारणात उतरते आणि त्यात तिची लढाई तिच्या सख्ख्या भावाशी असते.

घर सांभाळणारी सर्वसामान्य गृहिणी ते सत्ता सांभाळणारी महत्वकांक्षी राजकारणी. पौर्णिमाच्या अभिनेत्री प्रिया बापटच्या अशा दोन वेगळया छटा सिटी ऑफ ड्रीम्स या वेबसिरीजमधून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहेत. भावासोबत असणाऱ्या या राजकीय खेळीत कोण विजयी होईल, हे ‘सिटी ऑफ ड्रीम्स’हि वेबसिरीज पाहिल्यावरच कळेल. बहीण भावाच्या नात्यावर आधारितही वेबसिरीज पाहायला विसरू नका.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *