माथाडी कामगार फक्त कामगार राहता कामा नये आता मालकही झाले पाहिजे: उद्धव ठाकरे
नवी मुंबई: माथाडी कामगारांचे सर्वोच्च नेते स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या ८६ व्या जयंतीनिमित्त नवी मुंबईत भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले आज पहिल्यांदाच मी माथाडी कामगारांसमोर आलो आहे. हा भावनिक सोहळा आहे. तो काळ लढाईचा होता. बाळासाहेब आणि अण्णासाहेब यांनी मुंबईत मराठी माणसांमध्ये संघर्षाची ताकद पेटवली. आपल्या अनुयायांशी प्रामाणिक राहणारे नेते होते. ते पुढे म्हणाले महाराष्ट्राची माती देशाला दिशा देते. माथाडी कामगार फक्त कामगार राहता कामा नये आता मालक ही झाले पाहिजे. यावेळी शिवसेना भाजप युती बाबत भाष्य करताना ते म्हणाले की, “युतीचं सरकार येणारच आम्ही तुमच्या ताकदीनिशी पाठीशी आहोत.”
एकूणच या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोघेही याबाबत सकारात्मक असल्याचे जाणवले.
