मसूद अजहर चा खरंच मृत्य झालाय का ?
जैश ए मोहम्मद ह्या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अजहर याचा मृत्यू झाल्याचा दावा पाकिस्तान मधील प्रसार माध्यमांनी केला आहे. पण पाकिस्तानी सरकारने या बाबत कोणताही खुलासा केलेला नाही.
मसूद अजहर ने पाक मधील दहशतवाद्यांच्या प्रशिक्षणा साठी अनेक तळं उभारली आहेत. त्यातल्याच प्रमुख तळावर भारतीय हवाई दलाने हल्ला केला. ज्यात जवळपास ३५० दहशतवादी मारले गेल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतात झालेल्या गेल्या २० वर्षातील अनेक प्रमुख हल्ल्यांत त्याचा हात होता. त्यात कंदहार विमान अपहरण, तसेच संसद हल्ला आणि आता पुलवामा हे काही प्रमुख हल्ले आहेत.
एक पाकिस्तानी पत्रकारांने भारतीय हवाई दलाच्या हल्ल्यात मसूद अजहर जखमी झाल्याचे ट्विट केले होते. मसूद अजहर चा खरंच मृत्य झालाय का ? की की ही एक अफवा आहे ह्याचा भारतीय सुरक्षा यंत्रणा तपास करत आहेत.
