हवाई हल्ले तुम्हाला लोकसभा निवडणूका जिंकून देऊ शकत नाहीत मोदीजी : माजी सरन्यायाधीश
काटजू भारताचे माजी सरन्यायधीश मार्कंडेय काटजू यांनी मोदींना उद्देशून एक मार्मिक टिवट केले आहे. ते म्हणाले कि, “जे हवाई हल्ले झाले ते तुम्हाला लोकसभा निवडणूक जिंकून देऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला पाकिस्तान विरुध्द्व संपूर्ण युद्ध घोषित करावे लागेल.
तर कप्तान तुम्ही पुढे व्हा आम्ही तुमच्या बरोबर आहोत.”
त्याच बरोबर काल त्यांनी एक शायरी ही ट्विट केली आहे.
“सारे गधे सोए थे सुकून में, वोह भी आ गए अब जुनून में । हम तो रेहबर थे खमोशी के, पर आ गई गरमाहट हमारे खून में।”
मार्कंडेय काटजूंचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणांत व्हायरल होत आहे. आणि ह्या ट्विटवर नेटिझन्सकडूनही मार्मिक प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत.
