मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाला एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांची दांडी
औरंगाबाद: आज १७ सप्टेंबर, आजचा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी या दिनाचं औचित्य साधून औरंगाबादेत ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. सलग चार वर्षे विद्यमान खासदार इम्तियाज जलील हे या कार्यक्रमाला गैरहजर राहित आहेत. यावर्षी इम्तियाज जलील यांनी कार्यक्रमाला दांडी मारली व पुन्हा वादाला तोंड फुटलं.
एम.आय.एम. या पक्षाचा इतिहास पाहिला तर या पक्षाने मराठवाडा व हैदराबाद मुक्तीसंग्रामात येथील जनतेचा अमानुष छळ केलेल्या रझाकारांची बाजू घेतली होती. कार्यक्रमाला गैरहजर राहून त्यांनी रझाकारांचीच री ओढली आहे का असे म्हणणे वावगे ठरू नये.