Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

५६ व्या राज्य मराठी चित्रपट महोत्सवातील नामांकने जाहीर

५६ व्या राज्य मराठी चित्रपट महोत्सवातील नामांकने जाहीर

मुंबई : ५६ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवातील प्राथमिक फेरीच्या तीन नामांकनांची शिफारस तसेच सात तांत्रिक पुरस्कार व बालकलाकाराचे एक अशी आठ पारितोषिके शुक्रवारी (१२ एप्रिल) घोषित करण्यात आली आहेत.

अंतिम फेरीसाठी उत्कृष्ट बालकलाकारासाठी श्रीनिवास पोकळे (नाळ) आणि अमन कांबळे (तेंडल्या) यांना पारितोषिके घोषित करण्यात आली आहेत. तर …आणि डॉ. काशिनाथ घाणेकर, दिठी, आम्ही दोघी, भोंगा, फायरब्रँड, बंदिशाळा, एक सांगायचंय, अनसेड हार्मोनी, तेंडल्या, भूर्जी, चुंबक या दहा चित्रपटांचे उत्कृष्ट चित्रपटाच्या पारितोषिकांसाठी नामांकन झाले आहे.

५६ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवातील पारितोषिकांमध्ये उत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी नरेंद्र हळदणकर (बंदिशाळा), उत्कृष्ट ध्वनिमुद्रणासाठी गंधार मोकाशी (आणि डॉ. काशीनाथ घाणेकर), उत्कृष्ट संकलनासाठी नचिकेत वाईकर (तेंडल्या), उत्कृष्ट ध्वनी संयोजनासाठी मंदार कमलापूरकर (पुष्पक विमान), उत्कृष्ट छायालेखनासाठी सुधीर पळसाने (आणि डॉ. काशीनाथ घाणेकर), उत्कृष्ट वेशभूषासाठी चैत्राली गुप्ते (एक सांगायचंय अनसेड हार्मोनी), उत्कृष्ट रंगभूषासाठी विक्रम गायकवाड (आणि डॉ. काशीनाथ घाणेकर) यांना पारितोषिके घोषित करण्यात आली आहेत.

५६ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवातील पुरस्कार २६ मे २०१९ रोजी चित्रपटसृष्टीतील मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येतील.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *