लातूर जिल्ह्यात जैविक शौचालय उपक्रम राबवायला सुरुवात
लातूर जिल्ह्याला हागणदारीमुक्त व्हावा यासाठी लातूर जिल्हा परिषदेनं जिल्ह्यात जैविक शौचालय उपक्रम राबवायला सुरुवात केली आहे.
अशा प्रकारचा हा मराठवाड्यातला पहिलाचा उपक्रम ठरला आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्हा पाणी आणि स्वच्छता विभागानं उभारलेल्या सार्वजनिक बायो शौचालय उद्घाटन काल जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्या हस्ते झालं.