Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मराठमोळे ले.ज. मनोज नरवणे असतील देशाचे २८ वे लष्करप्रमुख

मराठमोळे ले.ज. मनोज नरवणे असतील देशाचे २८ वे लष्करप्रमुख

न्यायमूर्ती शरद बोबडे यांची देशाच्या मुख्य न्यायाधीश पदी निवड झाल्यानंतर आता मराठी माणसासाठी आणखी एक अभिमानाची गोष्ट होणार आहे. ती म्हणजे एक मराठी माणूस आता देशाच्या लष्कर प्रमुखपदी विराजमान होणार आहे. आणि त्यांचं नाव आहे मनोज नरवणे. ते भारताचे २८ वे लष्करप्रमुख असतील विद्यमान लष्करप्रमुख बिपीन रावत यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर रोजी समाप्त होणार असून. या जागेवर नरवणे विराजमान होणार आहेत.

त्यांनी पुण्यातील ज्ञानप्रबोधनी शाळेत शालेय शिक्षण पूर्ण केलं असून. त्यांनतर त्यांनी पुण्यातीलच ‘एनडीए’ मधून सैनिकी शिक्षण घेतलं. जवळपास ३३ वर्षांनंतर ले. ज. नरवणे यांच्या रूपाने एक मराठी माणूस देशाच्या लष्करप्रमुख पदी विराजमान होणार आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *