फिर एक बार मन की बात; नव्या कार्यकाळातला पहिला कार्यक्रम होणार ‘या’ दिवशी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मागच्या कार्यकाळात गाजलेला ‘मन की बात’ हा लोकसंवादाचा कार्यक्रम या कार्यकाळातही चालू राहणार आहे. ऑल इंडिया रेडिओ वरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम सामान्य भारतीयांशी जोडले जाण्यासाठीचा मोदींसाठी एक दुवा राहिला आहे. या महिन्याच्या शेवटी म्हणजेच रविवार दिनांक ३० जून सकाळी ११ वाजल्यापासून ऑल इंडिया रेडिओ वरून प्रसारित होणार आहे.
या कार्यक्रमामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधण्यासाठी १८०० ११ ७८०० या टोल फ्री क्रमांकावर कॉल केला जाऊ शकतो. फोन लाईन्स ११ ते २६ जून पर्यंत सर्वांसाठी खुल्या राहतील.
नरेंद्र मोदी हे ट्विटर वर ट्विट करत म्हणाले आहेत की आपण पुनः एकदा भेटू. मी रेडिओ चे आभार मानतो.
