Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“मागच्या ५ वर्षांत सगळं विनोदीच चाललं होतं”; शिवसेना प्रवक्त्या आ. डॉ. मनीषा कायंदे यांचा भाजप व विनोद तावडेंना टोला

“मागच्या ५ वर्षांत सगळं विनोदीच चाललं होतं”; शिवसेना प्रवक्त्या आ. डॉ. मनीषा कायंदे यांचा भाजप व विनोद तावडेंना टोला

मालवण: सिंधुदुर्ग जिल्हा कालाध्यापक संघाच्या वतीने आज दि. ६ रोजी ४१वी “राज्यस्तरीय कलाशिक्षण परिषद”, मालवण येथे आयोजित करण्यात आली आहे. शिवसेना प्रवक्त्या आमदार डॉ. मनीषा कायंदे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या तर ज्येष्ठ चित्रकार अरुण दाभोळकर यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले.

उपस्थितांना संबोधताना आमदार डॉ. कायंदे म्हणाल्या की, “सिंधुदुर्ग जिल्हा कलाध्यापक संघाच्या ज्या काही मागण्या असतील त्यांचा मी स्वतः व आमदार वैभव नाईक पाठपुरावा करू.” यावेळी त्यांनी मागील सरकारमधील भाजपच्या शिक्षण धोरणाचा खरपूस समाचार घेतला. माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे नाव न घेता त्या म्हणाल्या की, “मागच्या ५ वर्षांत सगळं विनोदीच चाललं होतं. या काळात शिक्षणाचाही विनोद झाला. कलाध्यापकांचा विशेष दर्जाही काढून टाकण्यात आला.” पुढे कलाध्यापकांचा विशेष दर्जा पूर्ववत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याजवळ पाठपुरावा करण्याचे वचन त्यांनी दिले.

या कार्यक्रमाला कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार व शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक, महेश तांदळकर, अध्यक्ष पी. आर. पाटील, संघाचे पदाधिकारी व सदस्य शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ६ ते ८ फेब्रुवारी दरम्यान चालणाऱ्या या परिषदेत निरनिराळ्या कलाप्रकारांचे सादरीकरण होणार आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *