Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

‘मांडूस’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील काही भागात पडू शकतो अवकाळी पाऊस

‘मांडूस’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील काही भागात पडू शकतो अवकाळी पाऊस

मुंबई, दि. १०: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मांडूस चक्रीवादळामुळे येत्या ४८ तासांत महाराष्ट्राच्या काही भागात अवकाळी पाऊस पडू शकतो. भारतीय हवामान विभागाने (IMD) शुक्रवारी ही माहिती दिली.

IMD मुंबई कडून सांगण्यात आले की, ४८ तासांनंतर कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. ते म्हणाले की, मांडूस २४ तासांनंतर किनारपट्टी भागात धडकण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात आर्द्रता निर्माण होत असून त्यामुळे महाराष्ट्रात हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. मांडूस या चक्रीवादळाचे नाव ‘मान-दस’ या अरबी शब्दावरून आले आहे, ज्याचा अर्थ खजिना असा आहे. हे नाव संयुक्त अरब अमिरातीने निवडले होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *