जाणून घ्या मलेरिया सारख्या त्रासदायक आजाराची लक्षणं
डब्लू.एच.ओ. म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेच्या २०१८ च्या जागतिक मलेरिया रिपोर्ट नुसार भारतात २०१६ च्या तुलनेत २०१७ मध्ये मलेरिया च्या तक्रारींमध्ये २४ टक्के कमतरता आली होती. त्याचसोबत वर्ष २०१८ मध्ये यामुळे झालेल्या मृत्यूंच प्रमाणही कमी झालं होतं.
मलेरिया मुळे सर्वात जास्त प्रभावित ११ देशांच्या यादीमध्ये भारत हा असा एकुलताएक देश आहे जिथे मच्छर च्या दंशामुळे होणाऱ्या या आजाराच्या तक्रारींमध्ये घट झाली आहे. ओडिशा, छत्तीसगड आणि पश्चिम बंगाल मलेरिया मुळे सर्वात जास्त प्रभावित होणारी राज्य आहेत. भारताचं लक्ष्य आहे की २०२७ पर्यंत देश मलेरिया मुक्त होऊन जावा.
आज आम्ही तुम्हाला मलेरिया बाबतची महत्वाची माहिती देणार आहोत ज्यामुळे तुमचं व तुमच्या परिवाराचं स्वास्थ्य राखण्यास मदत होईल.
कसा होतो मलेरिया
मलेरिया प्लाज्मोडीयम नावाच्या परजीवी मुळे होणारा आजार आहे. हा आजार ऍनॉफिलीस मच्छर च्या चाव्यामुळे होतो. हे मच्छर घाणेरड्या व साचलेल्या पाण्यात आढळतात.
ही आहेत मुख्य लक्षणं
१. थंडी वाजून शरीरभर हुडहुडी भरून प्रखर ताप येणे
२. प्रचंड डोकं दुखणे तसेच स्नायू दुखणे
३. कंबर दुखी होणे
४. उलटी येणे आणि सतत उलटी करण्याची इच्छा होणे
आजार गंभीर असण्याची लक्षणं
१. काविळ होणे
२. लघवी कमी होणे व पिवळी होणे
३. शुद्ध हरपणे
४. फीट येणे
