राज्य मंत्री मंडळाचा आज विस्तार, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे तेरा तर काँग्रेसच्या १० मंत्र्यांचा आज शपथविधी
मुंबई: महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज होणार आहे. विधानभवनाच्या प्रागंणात दुपारी एक वाजता हा शपथविधी सोहळा होणार असून एकूण ३६ मंत्र्यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पद आणि गोपनियतेची शपथ देतील.
या कार्यक्रमासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रत्येकी दहा कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्री, पद आणि गॊपनीयतेची शपथ घेतील. तर काँग्रेसकडून आठ कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री शपथ घेणार असल्याचं समजतं.
तिन्ही पक्षांच्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीला काल अंतिमरूप देण्यात आलं, आणि त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी ही यादी राज्यपालांकडे सोपवल्याचं वृत्त आहे.
(सौजन्य-AIR)
