महादेव बुक बेटिंग अॅप घोटाळ्यात नाव आल्यामुळे छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल गोत्यात?
नवी दिल्ली, दि. ७: महादेव बुक बेटिंग अॅप घोटाळ्याच्या संर्दभात सक्तवसुली संचालनालयानं दाखल केलेल्या तक्रारीत छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचं नाव आहे. आरोपपत्रानुसार या प्रकरणातला एक आरोपी सुभम सोनी याने प्रवर्तकांकडून सुमारे ५०८ कोटी रुपये भरल्याचा खुलासा केला आहे. तपासादरम्यान आरोपींनी दिलेल्या जबाबाच्या आधारे आरोपपत्रात भूपेश बघेल यांच्या नावाचा किमान चार ते पाच वेळा उल्लेख आहे. सुभम सोनी याने भूपेश बघेल यांना मोठी रोख रक्कम पोहोचवण्याची सूचना केली असल्याचं म्हटलं आहे.
Source – AIR
