Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

हिंमत असेल तर लोकसभेच्या रिंगणात उतरून दाखवा, पंकजा मुंडेंचं धनंजय मुंडेंना आव्हान

हिंमत असेल तर लोकसभेच्या रिंगणात उतरून दाखवा, पंकजा मुंडेंचं धनंजय मुंडेंना आव्हान

बीड: धनंजय मुंडे यांनी स्वतः लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरून लोकसभा लढवून दाखवावी असे म्हणत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंना आव्हान दिले आहे. बीडमधील प्रचारसभेत पंकजा मुंडे बोलत होत्या.

उमेदवारी अर्ज भरायला आणखी एक दिवस बाकी आहे. तुम्ही स्वतः लोकसभाच्या मैदानात उतरा मग कळेल जनता कोणाच्या मागे आहे, असेही पंकजा मुंडे यावेळी बोलल्या.

राज्याचे नेतृत्त्व करणारे बरेच जण मागच्या दराने येतात पण स्वतः मात्र निवडणूक लढवत नाहीत, इतरांना पुढे करतात. मी माझ्या वडिलांचा गड बांधला, त्यांनी चौथरा तरी बांधला का? असा प्रश्न देखील पंकजा मुंडे यांनी यावेळी विचारला.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *