१७ व्या लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर, आचारसंहिता लागू
ज्याची सर्व राजकीय पक्ष आतुरतेने वाट पाहत होते त्या १७ व्या लोकसभा निवडणुकांचे बिगुल आज निवडणूक आयोगाने वाजवले आहे. आज नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी पत्रकार परिषदेत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. एकूण ५४३ जागांसाठी एकूण ७ टप्प्यात मतदान होणार आहे. दिनांक ११ एप्रिल २०१९ रोजी पहिल्या टप्प्याने मतदानाला सुरवात होणार आहे व १९ मे २०१९ ला शेवटच्या टप्प्यात मतदान कार्यक्रमाची सांगता होणार आहे. २३ मे रोजी निवडणुकांचा निकाल लागणार आहे. निवडणूक आयोगाने सर्व मतदारांना मतदान प्रक्रियेत सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.
