आज रात्री १२ पासून संपूर्ण देश ‘लॉकडाऊन’ – पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील समस्त जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सबंध देशाला आज रात्री १२ वाजल्यापासून पुढील २१ दिवसांसाठी लॉकडाऊन करत असल्याची घोषणा केली. या २१ दिवसांत कोणालाही घरातून बाहेर पडण्याची परवानगी नसणार आहे. कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सबंध संचारबंदी(कर्फ्यु)ची घोषणा केली होती. महाराष्ट्रात आधीच लोकडाऊन ची घोषणा केली असल्याने इथले नागरिक मोदींनी केलेली घोषणा सहज पचवता येत आहे. पण उर्वरित देशात या घोषणेमुळे लोकं काही प्रमाणात चिंतेत आली आहेत.