कोरोना Updates: महाराष्ट्रातला कोरोना बाधितांचा आकडा वाढला
मुंबई: आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज कॉरोनाची सद्यस्थिती मांडताना कालपासून वाढलेल्या एकूण बाधित रुग्णांचा आकडा आता १०७ वर गेल्याचे म्हटले.
पहा नेमकं काय म्हणाले आरोग्यमंत्री –
राज्यात काल रात्रीपासून कोरोनाच्या १८ नविन रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्ण संख्या १०७ झाली आहे.या नवीन रुग्णांमध्ये मुंबईचे ६, सांगली मधील इस्लामपूरचे ४, पुण्याचे ३, सातारा जिल्ह्यातील २ तर अहमदनगर, कल्याण-डोंबिवली आणि ठाणे येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे.
नवीन बाधित रुग्णांपैकी सर्वाधिक म्हणजे ८ रुग्णांनी मध्यपूर्वेतील देशांमध्ये प्रवास केला आहे. तर इतर काही जणांनी अमेरिका, इंग्लंड आणि पेरु या देशात प्रवास केला आहे. दोन जण पूर्वी बाधित आढळलेल्या रुग्णाचे निकट सहवासित आहेत.