मी पुरुषांसोबत झोपत नाही – केआर रमेश कुमार यांचे वादग्रस्त विधान
बंगळुरू: ज्येष्ठ काँग्रेस नेते के. एच. मुनियप्पा यांच्याशी संबंध असल्यासंबंधी केआर रमेश कुमार यांना प्रश्न विचारले असता मी पुरुषांसोबत झोपत नाही असे उत्तर त्यांनी दिलं. वादग्रस्त उत्तरामुळे कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष के. आर. रमेश कुमार वादाच्या भोऱ्यात सापडले आहे.
१५ फेब्रुवारी रोजी मुनियप्पा यांनी “रमेश कुमार आणि आपण पती, पत्नीप्रमाणे आहोत. आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद नाही”, असं म्हटलं होतं. यावर प्रतीक्रिया देताना रमेश कुमार यांनी म्हटलं की, “मी पुरुषांसोबत झोपत नाही. माझी एक पत्नी असून गेल्या दहा वर्षांपासून मी विवाहित आहे. मुनियप्पा यांना माझ्यासोबत झोपण्यात रस असू शकतो, पण माझी तशी कोणतीही इच्छा नाही. माझे कोणाशीही कोणतेच संबंध नाहीत”.
मुनियप्पा यांना लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळू नये यासाठी रमेश कुमार यांनी हे वक्तव्य केलं आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.