Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

कोटक सिक्युरिटीजतर्फे पे लेटर (MTF) सह इक्विटी ट्रेडर्ससाठी ९.७५ % दराने ट्रेड फ्री प्रो योजनेचा झाला शुभारंभ

कोटक सिक्युरिटीजतर्फे पे लेटर (MTF) सह इक्विटी ट्रेडर्ससाठी ९.७५ % दराने ट्रेड फ्री प्रो योजनेचा झाला शुभारंभ

मुंबई, दि. २३: कोटक सिक्युरिटीजने त्यांच्या कोटक निओ आणि कोटक स्टॉक ट्रेडर या मंचावर ट्रेड फ्री प्रो प्लॅन योजनेचा शुभारंभ केला केला आहे. ट्रेडर्सना अनेक वैशिष्ट्ये सादर करणारी ही शुल्क आधारित योजना ९.७५ % व्याजदराने पे लेटर सुविधा प्रदान करते. याला मार्जिन ट्रेडिंग सुविधा (एमटीएफ) देखील म्हणतात. वापरकर्ते या मंचाच्या माध्यमातून एक हजार पेक्षा अधिक स्टोकसमध्ये व्यवहार करू शकतील आणि त्यांची खरेदीची क्षमता चार पटीपर्यंत वाढवू शकणार आहेत.

पे लेटर सुविधेची अन्य ठळक वैशिष्ट्ये म्हणजे अमर्यादित होल्डिंग कालावधी दिला जाणार आहे. तसेच शेअरबाजारात गुंतवणूकरुपी पोझिशन्स उभ्या करण्यासाठी तारण म्हणून रोख रकमेऐवजी शेरस आणि ईटीएफ वापरण्याची अनुमती दिली जाणार आहे. तसेच गुंतवणूकदारास एमटीएफ संशोधन टीमच्या  शिफारसींची सेवासुद्दा प्रदान केली जाणार आहे.

कोटक सिक्युरिटीजचे एमडी आणि सीईओ जयदीप हंसराज म्हणाले,  “आमच्या वाटचालीला आकार देण्यासाठी आमच्या ग्राहकांच्या गरजांकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. पे लेटर सुविधेची वाढती मागणी समजून घेतल्यानंतर आम्हाला ट्रेड फ्री प्रो योजना सादर करण्यास प्रोत्साहन मिळाले. शेअरबाजारातील ट्रेडर्सना जे हवे आहेत, त्यातून त्यांना सक्षम करण्याबाबत आम्ही वचनबद्ध असून वार्षिक 9.75 टक्के या परवडणार्‍या व्याजदराने योजना सादर करण्यास आम्ही उत्सुक आहोत. भारतातील गुंतवणूकदार आणि ट्रेडर्ससमोर आमचा ब्रँड कायम राहावा, यासाठी आम्ही आमच्या योजना सतत विकसित करण्यासाठी वचनबध्द आहोत.”

कोटक सिक्युरिटीजच्या डिजीटल बिझनेसचे अध्यक्ष आणि प्रमुख अशिष नंदा म्हणाले,  “आमच्या ग्राहकांच्या गरजा कोटक सिक्युरिटीजमधील योजनांच्या केंद्रस्थानी आहेत. ट्रेड फ्री प्रो योजनेचा शुभारंभ उद्योगातील मार्जिन ट्रेडिंग सुविधेच्या वाढत्या लोकप्रियतेला थेट प्रतिसाद देतो. वार्षिक 9.75 टक्के या अल्प व्याजदराने ही योजना सुरु करून, आमच्या ग्राहकांच्या ट्रेडिंग आकांक्षा मूर्त रुप देण्याबाबत आमची वचनबद्धता या योजनेतून पूर्ण करत आहोत.”

कोटक सिक्युरिटीज आपल्या ग्राहकांच्या नानाविध व्यवहार गरजा पूर्ण करण्यासाठी नवनवीन योजना प्रदान करण्यासाठी सतत आविष्कार करत आहे. प्रत्येक गुंतवणूकदाराला एकाच योजनेचा फायदा होऊ शकत नाही, ही कंपनीची धारणा आहे. म्हणूनच कोटक निओ प्लॅटफॉर्मवर व्यवहार करणाऱ्या ग्राहकांसाठी ट्रेड फ्री प्लॅन, ट्रेड फ्री यूथ प्लॅन आणि ट्रेड फ्री प्रो प्लॅन प्रदान करण्यात आलेले आहेत. ट्रेड फ्री प्लॅन सर्व इंट्राडे ट्रेड्सवर शून्य ब्रोकरेजच्या मुख्य प्रस्तावासह ट्रेड फ्री युथ प्लॅनसुध्दा सुरु करण्यात आला होता. यात ३० वर्षांखालील गुंतवणूकदरांना शून्य ब्रोकरेजची हमी असलेल्यांसाठी ट्रेड फ्री युथ प्लॅन उपलब्ध आहे. आणि आता ट्रेड फ्री प्रो योजना खासकरून एमटीएफ वापरकर्त्यांसाठी तयार करण्यात आलेली आहे. यातील घटकांना स्पर्धात्मक निधीचा फायदा होईल आणि हा निधी उद्योगात सर्वात कमी व्याजदराला उपलब्ध  आहे. दहा हजार रुपयांच्या निधीसाठी प्रतिदिन व्याज 3 रुपयांपेक्षा कमी (9.75% प्रति वर्ष) येते. ट्रेड एपीआय, नेस्ट टर्मिनल, इक्विटी स्क्रीनर, पेऑफ ॲनलायझर, दैनंदिन अल्प-मुदतीच्या आणि दीर्घकालीन संशोधन शिफारसी आदींसारख्या नानाविध सेवा आणि वैशिष्ट्यांच्या विनामूल्य लाभ घेण्याचा फायदा गुंतवणूकदार आणि ट्रेडर्सना होतो.

ट्रेड फ्री प्रोची रचना गुंतवणूकदारांना आणि ट्रेडर्सना स्पर्धात्मक पे-लेटर व्याजदर आणि सवलतीतील ब्रोकिंग शूल्काचे अतिरिक्त फायदे तसेच वैशिष्ट्यांच्या माध्यमातून अधिक सक्षम करण्यासाठी तयार करण्यात आलेले आहे. गुंतवणूकदार आणि ट्रेडर्स https://www.kotaksecurities.com/pricing/trade-free-pro/ या संकेतस्थळावर कोटक सिक्युरिटीजमध्ये ट्रेड फ्री प्रो खाते उघडू शकतात.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *