पुढचे चार दिवस राज्यात कोकणासह अनेक ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज
मुंबई, दि. ६ : कोकणात ८ आणि ९ ऑगस्टला अतिवृष्टी होईल. किनारपट्टीलगतच्या प्रदेशांत वादळी वाऱ्यांसह पाऊस दमदार हजेरी लावेल. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पुढचे चार दिवस जोरदार ते मुसळधार तर काही भागांत अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. एकंदरीतच पुढचे चार दिवस संपूर्ण राज्यात अनेक ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाचे आहेत.