शेतकरी मिशनचे अध्यक्ष भाजपच्या किशोर तिवारी यांनी केला सेना प्रवेश, युतीची दिशा नेमकी कुठे?
मुंबई: भाजपचे विदर्भातील नेते शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी आज शिवसेना भवन येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या प्रसंगी शिवसेना सचिव अनिल देसाई, खासदार विनायक राऊत, आरोग्य तथा एमएसआरडीसी उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे, शिवसना नेते मिलिंद नार्वेकर आणि शिशिर शिंदे उपस्थित होते.
किशोर तिवारी यांचं विदर्भातील शेतकरी प्रश्नांवर मोठं योगदान राहीलं आहे. शिवसेनेच्या अधिकृत कृषीविषयक सल्लागारपदी किशोर तिवारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या समस्या, प्रश्न तसेच त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी किशोर तिवारी यांची मोलाची मदत होणार आहे असे उद्धव ठाकरे यांनी या वेळी स्पष्ट केले. त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. आता प्रश्न असा पडतो की युतीचं जहाज नेमकं कोणत्या दिशेने चालू आहे?
