माजी केंद्रीय मंत्री स्वामी चिन्मयानंद बलात्काराच्या आरोपात अटकेत
उत्तर प्रदेश: अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये गृहराज्यमंत्री राहिलेले स्वामी चिन्मयानंद यांना विद्यार्थिनीवर अत्याचार प्रकरणी अटक करण्यात आली आहे. ‘एसआयटी’ ने आज शुक्रवार दिनांक २० रोजी मोठ्या संख्येत पोलिसांनी आश्रमाला घेरलं. पीडित मुलीचा सोमवारी १६४ अंतर्गत जबाब नोंदवण्यात आला आहे. त्यानंतरही पीडिता स्वामी चिन्मयानंद यांच्या विरोधात बलात्काराची केस दाखल करण्यात आली आणि त्यांच्या अटकेची मागणी केली.
उत्तर प्रदेशचे पोलिस महानिरीक्षक ओ. पी. सिंह म्हणाले की चौकशीमध्ये व्हिडिओची सत्यता पडताळून चिन्मयानंद यांना अटक झाली. या व्यक्तिरिक्त ब्लॅकमेल करणाऱ्या आणखी तीन लोकांनाही अटक करण्यात आली आहे.
