तर प्रदीप शिंदे यांच्यावर ठाणे शहर प्रमुख पदाची जबाबदारी
ठाणे/मुंबई, दि. ३१ : एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर ठाणे या त्यांच्या होम पिच वर उद्धव ठाकरे यांच्याकडून नव्याने पदाधिकार्यांची नियुक्ती करण्याचा सपाटा लावण्यात येत आहे. परंतू, यात आज ठाणे जिल्हाप्रमुख पदी दिवंगत शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांची नियुक्ती करत सार्यांनाच चकित केले. आज याच पार्श्वभूमीवर खासदार राजन विचारे यांच्या सोबत ठाण्यातील अनेक शिवसैनिक मातोश्री येथे जमा झाले होते. केदार दिघे यांच्या नियुक्तीसोबत ठाणे जिल्ह्यातील इतर पदांच्या नियुक्त्याही आज जाहीर करण्यात आल्या.
यावेळी अनिता बिर्जे यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर प्रदीप शिंदे यांच्यावर ठाणे शहर प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून चिंतामणी कारखानीस यांची ठाणे विभागीय प्रवक्ते पदावर नेमणूक करण्यात आली आहे. या संदर्भातील माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळवण्यात आली आहे.