kon honar karodpati
पहा कोण करतंय ‘कोण होणार करोडपती’ चं सूत्रसंचालन
सैराट फेम दिगदर्शक नागराज मंजुळे आता लवकरच आपल्याला एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. सोनी मराठीवरील ‘कोण होणार करोडपती’ या रियालिटी शोचे सूत्रसंचालन करताना तो आता दिसेल.
याबाबत स्वतः नागराज मंजुळे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून व्हिडीओ पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे. सोनी मराठी वाहिनीवर लवकरच ‘कोण होणार करोडपती’ हा शो सुरु होणार आहे.
याआधीच्या पर्वाचे नाव ‘कोण होईल मराठी करोडपती’ असे होते आणि त्याचे सूत्रसंचालन अभिनेता स्वप्नील जोशी करत होता. नागराज मंजुळे यांच्या गावरान मराठमोळ्या भाषेचा साज आता या मराठी शोमध्ये प्रेक्षकांना दिसून येणार आहे त्यामुळे प्रेक्षक या शोची आतुरतेने वाट पाहत आहेत.
कोण होणार करोडपती..!?@sonymarathitv pic.twitter.com/2aFJvLJVTo
— Nagraj Popatrao Manjule (@Nagrajmanjule) March 2, 2019
