Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

आज ‘क्वीन’ कंगना राणावत चा वाढदिवस, जाणून घ्या तिच्याविषयी

आज ‘क्वीन’ कंगना राणावत चा वाढदिवस, जाणून घ्या तिच्याविषयी

कंगनाचा जन्म २३ मार्च १९८७मध्ये हिमाचल प्रदेशमधील मनालीजवळील एका छोट्याशा गावात झाला. कंगनाचे वडील अमरदीप व्यवसायाने कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि आई आशा शिक्षिका आहे. कंगनाचे बालपण डेहरादूनमध्ये गेले. तेथेच डीएव्ही हायस्कूलमधून तिने तिचं शिक्षण पूर्ण केले. २००६ मध्ये आलेल्या थ्रिलर फिल्म “गैंगस्टर” यामधून कंगनाने आपल्या करियरला सुरुवात केली. यासाठी तिला बेस्ट फीमेल डेब्यू फिल्मफेअर अवार्ड सुद्धा मिळाला.

यानंतर २००६ च्या शेवटी आलेली फिल्म ‘वो लम्हे’ मध्ये तिने एक भावूक भूमिका केली . पुढे (२००७) ‘लाइफ इन मेट्रो’ आणि (२००८) ‘फॅशन’ सारखे सुपरहिट चित्रपट केले. ‘फॅशन’ साठी तीला उत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री म्हणून राष्ट्रीय फिल्मफेअर अवार्ड आणि याच श्रेणीत एक फिल्मफेअर अवार्ड सुद्धा मिळाले आहे.

‘मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटानंतर आता कंगना ‘मेंटल है क्या’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात कंगनासोबत राजकुमार राव मुख्य भूमिकेत दिसेल.

कंगना राणावतचे यशस्वी चित्रपट :

१) २००६ – गैंगस्टर

२) २००६ – वो लम्हे

३) २००७ – लाइफ इन मेट्रो

४) २००८ – फॅशन

५) २००९ – राज : द मिस्ट्री कंटिन्यूज

६) २०१० – वन्स अपऑन ए टाइम इन मुंबई

७) २०११ – तनु वेड्स मनु

८) २०१३ – क्रिश 3

९) २०१४ – क्वीन

१०) २०१५ – तनु वेड्स मनु रिटर्न्स

११) २०१९ – मणिकर्णिका -द क्वीन ऑफ झांसी

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *