Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

राज्यात अनेक ठिकाणी संध्याकाळपासून वीजांच्या कडकडाटांसह पाऊसाची हजेरी

राज्यात अनेक ठिकाणी संध्याकाळपासून वीजांच्या कडकडाटांसह पाऊसाची हजेरी

मुंबई, दि. ७ : राज्याच्या विविध भागात कालपासून कमी-अधिक प्रमाणात पावसाच्या सरी पडत आहेत. मुंबई शहर आणि उपनगरात दिवसभर विश्रांती घेऊन आज संध्याकाळी पावसानं पुन्हां हजेरी लावली आहे. नवी मुंबईत गडगडाटासह पावसाला सुरूवात झाली आहे. रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे. पनवेल, खालापूर, उरण, पेण, कर्जत, रोहा, माणगाव, पोलादपूर, महाड, पाली या तालुक्यात पाऊस पडत आहे.

पुणे शहरात देखील आज पावसानं पुन्हा हजेरी लावली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. चंद्रपूर शहरात पाऊस पडत असून  वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. औरंगाबादच्या वाळुंज एम आय डी सी भागात पाऊस सुरू आहे. सातारा शहरासह तालुका आणि जिल्ह्याच्या विविध भागात दुपार नंतर मुसळधार पाऊस पडत आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *