Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह; म्हणाले “मी पुन्हा येईन”

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह; म्हणाले “मी पुन्हा येईन”

ठाणे : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज स्वतःला सेल्फ क्वारंटाईन केल्याची बातमी दिवसभर चालू होती. काही वेळापूर्वीच जितेंद्र आव्हाड यांनी एक पोस्ट करत आपली काल कोविड-१९ ची चाचणी झाली व ती निगेटिव्ह आली अशी माहिती दिली. नेमकं आव्हाड काय म्हणाले ते पाहुयात.

“हो, काल माझी देखील कोव्हीड १९ ची टेस्ट करण्यात आली. माझ्या सोबत काम करणाऱ्या एका पोलीस सहकाऱ्याला कोरोना ची लागण झाल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या अनेकांच्या टेस्ट करण्यात आल्या आहेत. यात माझा देखील समावेश होता. माध्यमात या बातम्या आल्या आणि अनेकांचे फोन आणि मेसेजेस येत आहेत. आपण माझ्यावर जे प्रेम आणि विश्वास नेहमीच दाखवता त्याबद्दल मी आपला आभारी आहे.”

“सुदैवाने माझ्या टेस्ट चे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तरीही प्रोटोकॉल नुसार मला आता किमान १४ दिवस होम क्वारंटाईन व्हावे लागणार आहे.जी की अत्यावश्यक बाब आहे.”

“दुःख एका गोष्टीच वाटत की, लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर कळवा मुंब्रा भागात मी अन्नाची पाकीट गरजूंना वाटत होते. त्या मी रोज स्वतःच्या निरीक्षणाखाली बनवून घेत होतो. आता पुढील १४ दिवस ते शक्य नाही. तरी माझे सहकारी हे काम थांबवणार नाहीत, याची मी हमी देतो.”

“कळवा, मुंब्रा, सोलापूर आणि माझ्या महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना विनंती आहे की, कृपा करून घरी बसा. आणि आपली तशीच आपल्या परिवाराची काळजी घ्या.”

“येत्या ७ दिवसात पुन्हा एकदा कोरोना टेस्ट करण्यात येईल. आणि मला विश्वास आहे की, या टेस्ट चा रिपोर्ट देखील निगेटिव्ह येऊन, लवकरात लवकर तुमच्यामध्ये “मी पुन्हा येईन..!”

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *