महाराष्ट्रात मुलं पळवणारी टोळी सक्रिय- जितेंद्र आव्हाड
महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे – पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज भाजपात प्रवेश केला. या प्रवेशानंतर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटर च्या माध्यमातून भाजप पक्षावर खोचक टीका केली आहे.
महाराष्ट्रात मुलं पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे. सर्वांनी विशेषत: काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी, जनहितार्थ जारी असं हे ट्विट राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
महाराष्ट्रात मुलं पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे. सर्वांनी, विशेषतः काँग्रेस-राष्ट्रवादीतील पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी !
-जनहितार्थ जारी— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 12, 2019
