जिओ ग्राहकांना जोर का झटका, आजपासून मोफत आउटगोइंग कॉलिंग बंद
मुंबई: भारतीय दूरसंचार बाजारात जेव्हा रिलायन्सने जिओ लॉन्च केलं तेव्हा साऱ्या विश्वात भूकंप आला. जिओ ने थेट आउटगोइंग कॉल मोफत केल्यामुळे अनेक कंपन्यांना टाळही लागलं. एअरटेल वोडाफोन या दिग्गज कंपन्यांनीही आपले मासिक कॉलिंग पॅक चे दर थेट जिओच्या दरापर्यंत खाली आणले.
पण काल रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांवर मोफत कॉलिंग बंद करत असल्याची घोषणा करत बॉम्ब टाकला. त्यानुसार आजपासून जिओ ग्राहकांना प्रत्येक कॉल साठी दर मिनिटाला ६ पैसे मोजावे लागणार असल्याचं जाहीर केलं. गेल्या वर्षभरात आययुसी चार्जेस मुळे जीओला एकूण १३ हजार ५०० कोटी रुपये भरावे लागले असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. ही घोषणा झाल्यानंतर संतप्त जीओ ग्राहकांनी सोशल मीडियावर #boycottjio हा हॅशटॅग सुरू केला आहे. अनेक संतप्त ग्राहकांनी आपला रोष व्यक्त केला आहे.
