Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

आयटीआय म्युच्यूअल फंडातर्फे आयटीआय फोकस्ड इक्विटी फंडचा शुभारंभ

जास्तीत जास्त तीस समभागांच्या भांडवली बाजार मूल्यावर केंद्रीत अशा पोर्टफोलिओची उभारणी

मुंबई, दि. २९: आयटीआय़ म्युच्युअल फंडाने एप्रिल 2019 मध्ये आपल्या कामकाजाचा शुभारंभ केला असून गुंतवणूकदारांसाठी मुख्य प्रवाहातील 17 म्युच्युअल फंड बाजारात आणलेले आहेत. मालमत्ता व्यवस्थापन कंपनीला (एएमसी) रोखतेच्या बाबतीत समृद्ध असलेल्या पारंपारिक उद्योग समूहाचे पाठबळ लाभलेले आहे. गुंतवणुकदारांसाठी दीर्घकालीन गुंतवणुकीचा एक सहजसुंदर अनुभव मिळण्यासाठी अंत्यत कमी कालावधीत, या एएमसीमध्ये प्रशासन, ग्राहक, प्रक्रिया आणि पायाभूत सुविधा या घटकांच्या उभारणीवर उद्योगसमुहाने भर दिलेला आहे. आयटीआय 22 मे 2023 अखेरीस चार हजार 11 कोटी रुपयांच्या निधीचे व्यवस्थापन हाताळत आहे. एकूण व्यवस्थापित निधीपैकी 3,285 कोटी रुपये विविध समभागांत तर हायब्रीड आणि डेट योजनांत अनुक्रमे 432 कोटी आणि 295 कोटी रुपये गुंतवलेले आहेत. या एकूण निधीचे भौगोलिक वितरण अतिशय विविधांगी असून देशातील टॉप पाच शहरातून 46.10 टक्के, त्यानंतरच्या दहा शहरातून 21.99 टक्के, त्यापुढील वीस शहरातून 15.01 टक्के, तर या शहरानंतरच्या 75 शहरात 12.68 टक्के आणि राहिलेल्या बाकी शहरांचा हिस्सा 4.22 टक्के आहे.

आयटीआय म्युच्युअल फंडाने आयटीआय फोकस्ड इक्विटी फंड हा एनएफओ गुंतवणूकदारांसाठी आणत असल्याची घोषणा केली आहे आणि हा एनएफओ गुंतणकीसाठी आज उघडेल आणि येत्या 12 जून 2023 रोजी बंद होणार आहे. आयटीआय फोकस्ड इक्विटी फंड हा प्रामुख्याने 30 कंपन्यांच्या भांडवली बाजारमूल्यात गुंतवणूक करणारा अत्यंत केंद्रित असा पोर्टफोलिओ असणार आहे. या फंडात किमान पाच हजार रुपये आणि त्यानंतर एक रुपयांच्या पटीत गुंतवणूक करता येईल. या फंडाचे व्यवस्थापन धीमंत शहा आणि रोहन कोरडे हे संयुक्तरित्या सांभाळणार आहेत. आयटीआय फोकस्ड इक्विटी फंडासाठी निफ्टी 500 टोटल रिटर्न हा पायाभूत निर्देशांक राहणार आहे.

विविध भांडवली बाजारमूल्य असलेल्या तीस कंपन्याच्या समभाग आणि समभागांशी संबंधित तत्सम साधनांमध्ये हा फंड प्रामुख्याने गुंतवणूक करणार आहे.

दीर्घकाळ गुंतवणूकीचा दृष्टीकोन असलेल्या गुंतवणूकदारांसाठी हा एनएफओ सुयोग्य आहे.

एनएफओच्या शभारंभाची घोषणा करताना आटीआय म्युच्यूअल फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी राजेश भाटिया म्हणाले, “आमच्या गुंतवणूकदाराच्या जोखीम क्षमतेनुरूप बाजारात नवनवीन गुंतवणूक साधने आणणे हे एक फंड घराणे म्हणून आमचा सतत प्रयत्न राहिलेला आहे. आयटीआय फोकस्ड इक्विटी फंड हा प्रामुख्याने केंद्रीत पोर्टफोलिओ असून आमच्या गुंतवणूकदारांना दीर्घ मुदतीत विविध क्षेत्रातील वाढीचे घटक आणि वाढीचे शिलेदार यांचे फायदे मिळवून देण्याची आमची मनिषा आहे. उत्तम कामगिरीची परंपरा आणि गुंतवणूकीच्या भरभक्कम तत्वज्ञानाच्या आधारावर चालणाऱ्या आयटीआय म्युच्यूअल फंडाने विविध प्रकारच्या जोखीमक्षमता असलेल्या सर्व गुंतवणूकदारांसाठी गुंतवणूकीचे पर्याय देण्यावर लक्ष केंद्रीत केलेले आहे”.

चार वर्षांच्या कालावधीत, आयटीआय म्युच्युअल फंडाने 17 योजना सुरू केल्या आहेत आणि गुंतवणूकदारांना सर्वोत्तम गुंतवणुक अनुभव देण्यासाठी वचनबद्ध आहे.

आयटीआय म्युच्युअल फंडाचे देशात 57 हून अधिक ठिकाणी (त्यांच्या शाखा/आयटीआय समूह कार्यालयांसह) केंद्र आहेत आणि भारतभर 21 हजार 209 वितरकांचे जाळे कार्यरत आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *