Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

IPL 2019 : वेळापत्रकाची घोषणा !

IPL LOGO FULL twt

IPL 2019 : वेळापत्रकाची घोषणा !

इंडियन प्रिमीयर लिगच्या 2019 सिझनच्या पहिल्या दोन आठवड्यांचं वेळापत्रक आज जाहीर करण्यात आलं आहे.

T – 20 सामन्यांचे वेळापत्रक इंडियन प्रिमीयर लिगच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन आज शेअर करण्यात आले.

आयपीएल 2019 सिझनची सुरुवात 23 मार्चपासून होणार असून पहिला सामना अकराव्या IPL चा विजेता संघ चेन्ननई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाशी होणार आहे.

23 मार्च ते 5 एप्रिल या कालावधीत 17 T – 20 सामने होणार आहेत. आयपीएलच्या या हंगामात 8 संघ एकमेकांना भिडणार आहेत.

यंदाच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुकांमुळे आयपीएल देशाबाहेर खेळवण्यावर विचार सुरु होता. मात्र, अखेरीस ही स्पर्धा देशातच खेळवण्यावर एकमत झाल्याने वेळापत्रकानुसार पहिल्या दोन आठवड्यातील सामने भारतातच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *