Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

खुशखबर ! रेल्वेत १.३० लाखापेक्षा जास्त जागांसाठी नोकरभरती सुरु

Indian Railway Logo

खुशखबर ! रेल्वेत १.३० लाखापेक्षा जास्त जागांसाठी नोकरभरती सुरु

रेल्वे भरती महामंडळाने 1.30 लाख रिक्त पदांसाठी नोकरभरतीची जाहिरात काढली आहे. ही जाहिरात 23 फेब्रुवारी ते 1 मार्चदरम्यान एम्प्लॉयमेंट न्यूजपेपरमध्ये प्रकाशित होणार आहे.

याबाबतची अधिक माहिती आरआरबीच्या संकेतस्थळावर लवकरच जारी करण्यात येणार आहे.

अ-तांत्रिक श्रेणीमध्ये ३० हजार रिक्त पदांसाठी लवकरच अर्ज मागवण्यात येणार आहेत. अ-तांत्रिक श्रेणीमध्ये अकाउंट्स क्लार्क कम टायपिस्ट, जूनियर क्लार्क कम टायपिस्ट, कमर्शियल कम तिकीट क्लार्क,
ट्रॅफिक असिस्टंट, सीनियर कमर्शियल कम तिकीट क्लर्क, सीनियर क्लार्क कम टायपिस्ट, जूनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट, स्टेशन मास्टर, कमर्शियल अप्रैंटिस, गुड्स गार्ड, ट्रेन्स क्लार्क यांसारख्या पदांचा समावेश असणार आहे.

तसेच पॅरामेडिकल, मिनिस्टिरियल अँड आयसोलेटेड आणि श्रमिक श्रेणी-१ साठी सुमारे १ लाख रिक्त पदे भरली जाणार आहेत.

पॅरामेडिकल श्रेणीत हेल्थ अँड मलेरिया इंस्पेक्टर,
स्टाफ नर्स, ईसीजी टेक्निशियन, लॅब सुप्रिटेंडंट,
लॅब असिस्टंट, फार्मासिस्ट या तर मिनिस्टिरियल अँड आयसोलेटेड या श्रेणीमध्ये चीफ लॉ असिस्टंट, जूनियर ट्रांसलेटर (हिंदी) स्टेनोग्राफर या पदांसाठी अर्ज मागवण्यात येणार आहेत.

तर श्रमिक श्रेणी-१ साठी टेक्निकल विभागामध्ये हेल्पर/असिस्टंट, ट्रॅक मेंनटेनर ग्रेड आयव्ही, असिस्टंट पॉइंट्समॅन आणि अन्य विभागांमधील रिक्त पदांसाठी नोकरभरती करण्यात येणार आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *