Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

सर्वोच्च न्यायालयाकडून चिदंबरम यांचा जमीन अर्ज रद्द, न्यायालय म्हणलं की……

जमीन अर्ज रद्द करताना सर्वोच्च न्यायालय म्हणलं “ईडीने जे पुरावे कागदपत्र गोळा केले आहेत ते चिदंबरम यांना दाखवण्याची गरज नाही”

नवी दिल्ली: माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांना ‘आयएनएक्स मीडिया’ प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज झटका दिला. चिदंबरम यांना जामीन नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन अर्ज रद्द झाल्यामुळे आता सक्तवसुली संचालनालय(ईडी) चौकशीसाठी चिदंबरम यांना कोणत्याही क्षणी अटक करू शकते.

काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटलं की ईडीने जे पुरावे कागदपत्र गोळा केले आहेत ते चिदंबरम यांना दाखवण्याची गरज नाही. त्याचसोबत न्यायालय म्हणाले ईडीने पी. चिदंबरम यांना जे प्रश्न विचारले आहेत त्यांची ट्रान्स्क्रिप्टही कोर्टाला देण्याची काही गरज नाही. या आदेशानंतर असं म्हटलं जातंय की आज गुरुवारीच ईडी पी. चिदंबरम यांना ताब्यात घेऊन चौकशीला सुरुवात करू शकते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *