इन्फोसिस ला मंदीचा फटका? कर्मचाऱ्याने केला खोटा नफा दाखवल्याचा आरोप
देशातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी कंपनी इन्फोसिस कंपनीचे शेअर्स आज सकाळी बाजार उघडताच १६ टक्क्यांनी खाली आले. सध्याचा त्याच्या शेअर चा दर आहे ६४९.९५. याला कारणही तसंच आहे. इन्फोसिस च्या कर्मचाऱ्याने कंपनीच्या मॅनेजमेंट वर ताळेबंदात नफ्याची आकडेवारी वाढवल्याचा गंभीर आरोप काल केला होता. या आरोपामुळे इन्फोसिस कंपनीच्या शेअर होल्डर्स मध्ये एकच गोंधळ उडाला. ज्याची परिणीती शेअर्सचे दर पाडण्यात झाली.
रविवारी कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने चार पानी निनावी पत्र लिहिती आरोप केला की मागील तिमाहीत कंपनीने नफ्याचा खोटा आकडा दाखवला. या संदर्भातले पुरावे आपल्यापाशी असल्याचेही या कर्मचाऱ्याने नमूद केले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कंपनीचे मुख्य कार्यकारी संचालकांवर संशयाची सुई फिरायला लागली आहे. आर्थिक मंदीचा फटका इन्फोसिस ला मोठ्या प्रमाणात बसल्याचे विश्लेषकांचे मत असून यामुळे मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात होण्याची शक्यता आहे.
